MB NEWS-भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक;एक जण ठार तर नऊ जण जखमी

 भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक;एक जण ठार तर नऊ जण जखमी



गेवराई : आरणहून गायकवाड जळगाव येथे ज्यो घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने आज (दि. २०) पहाटे तीन वाजता जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर जवळील ईटकूर फाट्यावर घडली.

गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील काही भाविक आरणहून आपल्या गावाकडे ज्योत घेऊन जात होते. पहाटे तीन वाजता भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने (एमएच 20 ईजी 0055) जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत अण्णासाहेब आ (वय 4२) हे जागीच ठार झाले. तर विश्वंभर देवीदास अंतरकर, शैलेश जानकीराम कातखडे, ऋषिकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडू वाघमारे, नंदू भाऊसाहेब आगरकर, बाळू भारत आगरकर हे जखमी झाले. जखमींना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार