MB NEWS-परळीच्या संजय जब्दे यांची अमेरिकेत निवड

 परळीच्या  संजय जब्दे यांची अमेरिकेत निवड 



 परळी (२०) परळी येथील अभियंता श्री. संजय चंद्रकांत जब्दे यांची शिकागो अमेरिका येथील प्रतिथयश अश्या रॉकवेल ॲटोमेशन या कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून निवड झालेली आहे.

 श्री.संजय जब्दे हे स्व.स्वा.दिगंबरराव जब्दे यांचे नातू आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री संस्कार विद्या मंदिर,पद्मावती गल्ली, परळी वैजनाथ येथे झाले आहे तर विद्यालयीन शिक्षण हे Mordern College येथे झालेले आहे त्या नंतर पदवी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तुळजापूर येथे Electronics & Telecommunications झाले व नंतर M.Tech in Instrumentation & Controls श्री गुरू गोविंद सिंघजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथून झाले आहे. 22 जुलै ला मुंबई येथून जाणार आहेत.    याबद्दल यशस्वी वाटचालीत त्यांचे वडील श्री.चंद्रकांत जब्दे,आई सौ.अरुणा जब्दे ,भाऊ श्री.धनंजय जब्दे,काका श्री दिलीपराव कुलकर्णी, मावशी सौ.छाया कुलकर्णी तसेच सर्व परिवार, मित्र मंडळ यांनी आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !