MB NEWS-जन्नामन्ना व अंदर बाहर खेळणारांवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल व २८ जणांना घेतले ताब्यात

 जन्नामन्ना व अंदर बाहर खेळणारांवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल व २८ जणांना घेतले ताब्यात



पंंकज कुमावत यांच्या पथकाची  कारवाई



परळी (प्रतिनिधी)- सहाय्यक पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत बेकायदेशीररित्या अंबाजोगाई परळी रोडच्या उत्तर बाजूस भोपळा शिवारात एका हॉटेलच्या शेजारील शेतात पत्र्याच्या बंद रूममध्ये काही व्यक्ती एकत्र बसून, लाईटच्या उजेडामध्ये लोकांकडून पैसे घेऊन जन्नामन्ना जुगाराचा खेळ खेळत होते. कार्यालयातील पोलीस स्टेशन केज येथील अंमलदार यांना सोबत घेऊन या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई केली.


या पथकातील कारवाई पोह बांगर, दराडे, गीते भंडाणे मंदी, पोशि बहिरवाळ तुले असे कर्मचारी खाजगी वाहनाने सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासोबत पोना वंजारी, अंगरक्षक पोशि जावले व दोन पंच घेऊन, रात्री हॉटेल सातबाराच्या पाठीमागे पत्र्याच्या रुममध्ये जाऊन रात्री बाराच्या दरम्यान छापा मारला. या ठिकाणी पत्र्याच्या बंद शेडमध्ये काही इसम जन्नामन्ना नावाचा, अंदर बाहर जुगार खेळताना मिळून आले.या आरोपींंना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता नगदी रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य मिळून आले. तसेच गाड्यांच्या किमतीसह नगदी रक्कम रुपये ३८६००० मिळाले.


       सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन परळी येथे गुन्हा नोंदवण्यात आला. ही कामगिरी सहा.पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या प्रकरणातील एकूण २८आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे ४, ५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार