MB NEWS - अंशतः बदल :विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या फक्त परळी व अंबाजोगाई तालुक्याचाच दौरा करणार

 विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या रविवारच्या बीड जिल्हा दौऱ्यात अंशतः बदल - ऍड. राजेश्वर चव्हाण



परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची करणार पाहणी, अन्य तालुक्यातील नुकसानीचा घेणार आढावा


परळी वै. (दि. 30) - राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत रविवारी (दि. 31 जुलै) सकाळी 8 वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांचा दौरा करणार असून, ते जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हान यांनी दिली आहे.


रविवारी अजितदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 9 वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, असे असताना सत्ता पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्यातरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही, मात्र विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळते आहे. 


दरम्यान अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे परळी नंतर सकाळी 10.15 वा. जवळगाव ता. अंबाजोगाई येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील, त्याचबरोबर ते बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची परळी व अंबाजोगाई येथे निवेदने स्वीकारून त्यांच्याकडून तालुकानिहाय माहिती घेतील. अंबाजोगाई वरून पुढे ते लातूर मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार असून, बीड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील प्रत्यक्ष भेटी काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !