MB NEWS-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे,जमीनीचे आणि घरांचे तात्काळ पंचनामे करा -राजेश गित्ते

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे,जमीनीचे आणि घरांचे तात्काळ पंचनामे करा -राजेश गित्ते     


 






  परळी........

      परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि पुढील काही दिवस आणखीन मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.          मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी यांनी पेरणी केलेली पिके(कापूस, सोयाबीन,बाजरी) बाळ अवस्थेत आहेत आणि मोठ्या पाऊसा मुळे पिके पिवळी पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या मुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नदी -नाल्या लगत च्या जमीनी खरडुन गेल्या आहेत त्याच बरोबर घरांची मोठी पडझड झालेली आहे.तरी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करून बाधितांना नुकसान भरपाई मिळवून दयावी असे निवेदन तहसीलदार, परळी वैजनाथ यांना भाजपा नेते राजेश गिते यांनी दिले आहे.     

               Click &Read:नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय

        या निवेदना वर मिरवट सरपंच धुराजी साबळे,मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, रामकिसन गिते, सोमनाथ गिते व विविध गावचे  शेतकरी आणि नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.      निवेदनाची प्रत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांना पाठवून प्रशासनाला सुचना करून लवकरात लवकर पंचनामे करण्यास सांगावे अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Click &watch:अतिपावसाने धानं ओंबाळली;उगवती पीकं हातची जाण्याचा धोका

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !