MB NEWS-लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात!

 लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात!



बीड दि. 19 : महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अंंबोरा रा पोलीस ठाण्यात लाचखोर ग्रामसेविकेसह एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

       सोनाली अरविंद साखरे (वय 39, रा. गवंडी गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. त्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रमसेवक म्हणून कार्यरत होत्या. त्यानी तक्रारदार यांचे वडिलांचे निधन झाले असून त्यांचे नावावरील प्लॉटचा उतारा तक्रारदार यांनी मागितला होता. सदर उतारा काढून देण्यासाठी लोकसेविका सोनाली साखरे यांनी तक्रारदार यांचेकडे तीन हजारांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच खाजगी इसम चांगदेव दळवी (रा. पिंपळगाव घाट, ता. आष्टी जि. बीड) यांनी लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोठडी अमोल धस, अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश मेहेत्रे यांनी केली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार