MB NEWS-दिवसा ढवळ्या घर फोडून सव्वा लाखचे दागीने पळवले

 दिवसा ढवळ्या घर फोडून सव्वा लाखचे दागीने पळवले



माजलगाव- (प्रतिनिधी) तालुक्यातील पवारवाडी येथील भागवत एकनाथ धुमाळ या शेतकऱ्याचे घर अज्ञात  चोरट्याने दिवसाढवळ्या फोडून घरातील  कपाटातील सोन्या चांदीच्या दागिनेसह नगदी रोख मिळून एक लाख 16 हजार रुपयाचा ऐवज पळविल्याची घटना दिनांक एक शुक्रवार  रोजी घडली.

क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*

           पवारवाडी येथील शेतकरी भागवत एकनाथ धुमाळ हे दिनांक एक रोजी आपल्या कुटुंबासह सकाळी नऊ वाजता शेतात गेले होते ते सायंकाळी शेतातून परत आल्यानंतर त्यांच्या घराचे कडी कोंडे तोडलेले अवस्थेत त्यांना दिसून आली त्यांनी तात्काळ शेजारील लोकांना ही घटना सांगून घरात प्रवेश केला असता त्यांना कपाट तोडलेले अवस्थेत दिसून आले त्यांनी कपाटाची पाहणी केले असता. कपाटातील सोन्याचे झुंबर दोन नग गळ्यातील पोत अंगठ्या दोन नथनी चांदीचे चैन साखळी नगदी रोख साडेआठ हजार रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता माजलगाव ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी येऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला व तात्काळ डाँग पथक,ठसे तज्ञ बोलून घटना स्थळासह परिसराची पाहणी केली.या प्रकरणी भागवत एकनाथ धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ए.एस.आय.एस. आर.बळवंते हे करत आहेत.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार