MB NEWS -रजारोखीकरण व सेवाउपदानाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याच्या आश्वासनाने उपोषण स्थगीत - कॉ बी जी खाडे

 रजारोखीकरण व सेवा उपदानाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याच्या आश्वासनाने उपोषण स्थगीत - कॉ बी जी खाडे



परळी वै.ता.१९ प्रतिनिधी


 सेवाउपदानाची व रजारोखीकरणाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याचे व सातव्या वेतनाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम दोन महिन्यात देण्याचे नगर परिषदेच्या मुख्याधीकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.१८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगीत केले असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष कॉ बी जी खाडे यांनी दिली आहे.


       राज्य सरकारनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे सातव्या वेतनाचा फरकाचे दोन हप्ते  देण्यासाठी सर्व नगर परिषदेस सुमारे चारशे कोटी रूपये वर्ग केले आहेत. परळी नगर परिषदेस ३ कोटी ८९ लाख रूपये दिले आहेत. परळी नगर परिषदेनी केवळ एका हप्त्यावर बोळवण केली आहे. हक्काची असलेली सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळावी यासह  २०१६ नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणची रक्कम मिळावी या मागणीसाठी सेवा निवृत्त कर्मचारी सोमवारी (ता.१८) सकाळी परळी नगर परिषदे समोर उपोषणास बसले होते.

परळी नगरपरिषदेचे बावन्न सेवानिवृत कर्मचारी दिवसभर भरपावसात उपोषणास बसले होते. सोमवारी (ता.१८) रात्री आठ च्या सुमारास परळी नगर परिषदेचे मुख्याधीकारी बोंदर, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ बी जी खाडे, सचिव जगन्नाथ शहाने, किरण सावजी सांच्यात बैठक झाली. त्यात रजारोखीकरणाची व सेवाउपदानाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याचे व उर्वरीत सत्तर टक्के रक्कम मार्च २०२३ अखेर देण्याचे तसेच सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता दोन महिन्यात देण्याचे लेखी आश्वासन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेस मुख्याधीकारी यांनी दिले. उपोषणास लोकनेते प्रा टी पी मुंडे, नगरसेवक पवन मुंडे, नगरसेवक नितीन समशेट्टी आश्वीन मोगरकर यांनी भेट देउन पाठींबा व्यक्त केला होता. संघटनेच्या वतीने उपोषण स्थगीत करण्यात आले. यावेळी प्रा टी पी मुंडे मुख्याधिकारी बोंदर यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले. यावेळी सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ बी जी खाडे सचिव जगन्नाथ शहाने, कॉ किरण सावजी, सय्यद ताहेर, त्रींबक शिंदे, आर्जुन शिंदे, रमेश जगतकर, शांताबाई वाव्हळे, रूक्मीन सोनकांबळे, शशिकला धुमाळ यांच्यासह ५२ सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते. उपोषण यशस्वी करण्यासाठी जालींदर गिरी, शेख जावेद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार