MB NEWS-सातव्या वेतनाच्या फरकाची रकमेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

 सातव्या वेतनाच्या फरकाची रकमेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू



परळी वै.ता.१८ प्रतिनिधी


  नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाचा फरक देण्यासाठी शासनानी चार कोटी दिलेले आहेत. त्यातुन दोन्ही हप्त्याच्या रकमेसाठी बावन्न सेवा निवृत्त कर्मचारी सोमवार (ता.१८) पासुन परळी नगर परिषदे समोर उपोषणास बसले आहेत.

       राज्य सरकारनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे सातव्या वेतनाचा फरकाचे दोन हप्ते  देण्यासाठी सर्व नगर परिषदेस सुमारे चारशे कोटी रूपये वर्ग केले आहेत. परळी नगर परिषदेस ३ कोटी ८९ लाख रूपये दिले आहेत. परळी नगर परिषदेनी केवळ एका हप्त्यावर बोळवण केली आहे. हक्काची असलेली सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळावी यासह  २०१६ नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणचे पैसे दिले जातात. महाराष्ट्रातील  सर्व नगर परिषदांमधून सेवानिवृत कर्मचारी यांचे देणे सेवानिवृत्ती दिवशीच दिल्या जातात. परंतू परळी नगरपरिषदेच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर मात्र आंदोलन, उपोषण करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. पाच वर्षानंतरही उपदान मिळत नाही. या मागण्यांसाठी १६ जुन २०२२ रोजी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने निवेदन दिले होते. त्यामुळे नगर पपिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी सोमवार (ता.१८) सकाळी दहा वाजल्या पासुन उपोषणास बसले आहेत. सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ बी जी खाडे यांच्या नेतृत्वाखाली जगन्नाथ शहाने, सय्यद ताहेर, त्रींबक ळहाने, आर्जुन शिंदे, रमेश जगतकर, शांताबाई वाव्हळे, रूक्मीन सोनकांबळे, शशिकला धुमाळ यांच्यासह ५२ सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणास बसले आहेत. सोमवारी परळी शहरात दिवसभर भीज पाउस पडत होता. त्या पावसात सर्व वयाची साठी ओलांडलेले सेवा निवृत्त कर्माचारी उपोषणास बसलेले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !