MB NEWS-विजेच्या लपंडावाला परळीकर कंटाळले; भाजपाने अधिकार्‍यांना दिले निवेदन

 विजेच्या लपंडावाला परळीकर कंटाळले; भाजपाने अधिकार्‍यांना दिले निवेदन 









परळी वैजनाथ दि. ७....

        शहरात सध्या सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरीक वैतागून गेले असुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान नागरीकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्नावर भाजपाने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीज पुरवठा त्वरित सुरळीत नाही केला तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

               सध्या परळी शहरात दिवसातून अनेकवेळा लाईट जात आहे. काही कारण नसताना विजेचा लपंडाव सुरू आहे. मान्सूनपूर्व कामे केलेली नसल्याने वीज पुरवठ्याला अडथळे येत आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना महावितरण कंपनी बद्दल चीड निर्माण झाली आहे. ऐनवेळी कामाच्यावेळीच लाईट गुल होत असल्याने व्यापारी वैतागून गेले आहेत. आभाळ आलं तरीही वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीजबिल धारकांना नाहक त्रास होत आहे. महावितरणच्या या त्रासाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

           कार्यकर्त्यांनी मोर्चाचे रूपात महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित असलेल्या अधिक्षक अभियंता वाघमारे यांची भेट घेऊन परळीकरांच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. यावेळी अभियंता आंबटकरही उपस्थित होते. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. 

        या आंदोलनात भाजपचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे, योगेश पांडकर, सचिन गित्ते, श्रीनिवास राऊत, राजेश कौलवार, नितीन समसेट्टी, बाळू फुले, विजय बुंदेले, गोपी कांगणे, ज्ञानेश्वर मुंडे, शाम गित्ते, चैतन्य मुंडे, प्रदीप सुरवसे, कान्हा केंद्रे, शिवदीप चौंडे, ज्ञानेश्वर फड , शुभम बदने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


*असाच प्रकार सुरू राहीला तर अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू - प्रा. पवन मुंडे*

     दरम्यान विजेच्या लंपडावामुळे नागरीक वैतागून गेले आहेत. असाच प्रकार पुढेही चालू राहिला तर आगामी काळात संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन केले जाईल असा इशारा नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी यावेळी दिला.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार