MB NEWS-परळी शहर कोरडे आणि परळीच्या पंचक्रोशीत तब्बल पाऊणतास जोरदार श्रावणधारा बरसल्या !

 परळी शहर कोरडे आणि परळीच्या पंचक्रोशीत तब्बल पाऊणतास जोरदार श्रावणधारा बरसल्या !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
        गेल्या काही दिवसापासून उघड दिलेल्या पावसाने पुन्हा परळीच्या पंचक्रोशीत जोरदार पुनरागमन केल्याच्या दिसून आले. परळीच्या अवतीभवती व तालुक्यात सर्व दूर ग्रामीण भागात जोरदार मोठा पाऊस झाला मात्र धर्मापुरी फाटा ते परळी शहर यादरम्यान पाऊस पडलाच नाही.
  आज दिवसभर कडक ऊन पडले होते. पावसाची सुतरामही शक्यता वाटत नव्हती. अशावेळी परळीच्या पंचक्रोशीत मात्र जोरदार पाऊस झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसात पावसाने उघड दिल्यामुळे शेतीतील कामे आवरून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता मात्र आज दिनांक 30 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरण बदलले व जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस तब्बल पाऊण तास होता धर्मपुरी फाटा ते परळी शहर वगळून परळीच्या पंचक्रोशीत सर्व दूर हा पाऊस झाल्याची माहिती पुढे आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार