MB NEWS-नाभिक समाज गुणवंत विद्यार्थी गौरव - सोहळा संपन्न

 नाभिक समाज गुणवंत विद्यार्थी गौरव - सोहळा संपन्न



परळी येथील समता नगर भागात श्री संत सेना महाराज मंदिरात नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या समारोहात 2022 मध्ये १०वी, १२ वी बोर्ड परीक्षेत

चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाण पत्र, गौरव-चिह्न व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री देवीदास राव कावरे हे होते तर प्रमुख. पाहुणे म्हणून महिला कॉलेज परळीच्या प्रा.डॉ.कचरे मॅडम, श्री संत भगवान बाबा विद्यालयाचे प्राचार्य आर. एम. घुले, शास्त्री जनरल स्टोअर्सचे मालक प्रशांतकुमार शास्त्री, वैद्यनाथ कॉलेजचे निवृत्त प्रा.एस.आर.सूर्यवंशी, न्यू हायस्कूल चे सेवा निवृत्त मुख्याध्यापक एम.एस.चव्हान अंबाजोगाई चे सामाजिक कार्यकर्ते कविराज कचरे उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचा नाभिक समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर काम करण्याचे व मोठे माणूस बनण्याचे स्वप्न पहा आणि त्या साठी आता पासूनच तयारीला लागा तसेच लोप पावत चाललेली माणुसकी जपा असा मोलाचा सल्ला दिला. या वेळी गुणवंतांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.


कु.प्रतीक्षा कस्तुरे हिचे स्वागत गीत झाले. प्रास्ताविक पंडित सूर्यवंशी यांनी केले. सूत्र संचालन दगडू मोती यांनी केले तर समारोप नवनाथ घुले यांनी केले. या कार्यक्रमाची कल्पना आणि रूपरेषा न्यू हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी. वाघमारे यांची होती. या कार्यक्रमात घुले परिवार, मोती परिवार तसेच प्रभाकर कांबळे, शरद कावरे, बजरंग चोपडे, अरुण शिंदे वाल्मिक घुले, एकनाथ घुले, बालाजी मोती, गोविंद मोती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात युवकांनी पुढे होऊन उत्स्फूर्त पणे काम केले. सर्व समाज बांधवानी मिळून कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !