परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शाळेतून न सांगताच निघालेला शाळकरी मुलगा परळी पोलीसांनी केला नातेवाईकांना सुपूर्द
पुर्णा जि.परभणी येथील सुरज शिवाजीराव कदम हा मुलगा वडवणी येथे निवासी शाळेत शिकायला आहे. हा मुलगा शाळेतून न सांगताच निघाला.वडवणीहून बसमध्ये बसला.परंतु पैसे नसल्याने कंडक्टरच्या लक्षात आले.परळीपर्यंत त्याला बसमध्ये आणून बसस्थानक ड्युटीवर असलेल्या पोलीसच्या हवाली केले.
बसस्थानक ड्युटीवर असलेल्या पोलीस काॅन्स्टेबल मारोती मुजमुले यांनी या मुलाला संभाजीनगर पोलीस ठाण्यात आणले.एपीआय गित्ते, पीएसआय मेंडके,पोना दहिवाळ, शत्रुघ्न शिंदे यांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. सुरज शिवाजीराव कदम या मुलाचे काका रामराव विठ्ठलराव पौळ रा.पौळ पिंपरी यांच्याकडे सुपूर्द केला.नातेवाईकांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा