MB NEWS-तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची गावकर्‍यांची तक्रार

 स्मशानभूमीवर अतिक्रमण; प्रेत शेतावर जाळण्याची वेळ



तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची गावकर्‍यांची तक्रार 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : वडखेल येथील हटकर समाजाच्या स्मशानभूमीवर गावातीलच एका इसमाने अतिक्रमण केल्याने गावात मृत्यू झाल्यास लोकांना आपल्या नातेवाईकांची प्रेतं स्वतःच्या शेतावर नेऊन जाळवी लागत आहेत. याबाबत परळी तहसिलदार यांच्याकडे ग्रामपंचायतच्या वतीने तक्रार करण्यात आली असून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याबाबत गावकरी काही आमदारांच्या संपर्कात आहेत.

           परळी वैजनाथ तालुक्यातील वडखेल येथील हटकर समाजाची स्मशानभूमी गावच्या पूर्वेला आहे. तशी स्पष्ट नोंद संबंधित जमिनीच्या सातबारावर आहे. मात्र या जागेवर मनोहर आबा देवकते या व्यक्तीने अतिक्रमण केले होते. याबाबत गावक-यांनी तलाठी आणि ग्रामसेवकाकडे तक्रार करताच गेल्या वर्षी या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. तलाठी दिगंबर साबने आणि ग्रामसेवक ताटे यांनी यावेळी अतिक्रमण हटविल्याचा पंचनामा शेकडो गावक-यांच्या समक्ष केला होता. त्यावर 50 पेक्षा अधिक गावक-यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. स्मशानभूमीचे बांधकाम अतिक्रमणामुळे प्रलंबित होते. अतिक्रमण हटविताच तलाठी आणि ग्रामसेकासमक्ष स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जेसीबीने पाया खोधण्यात आला होता. त्यानंतर पावसाळ्यात येथील मोकळ्या जागेत वृक्षलागवडही करण्यात आली होती.

          आता या स्मशानभूमीचे काम मार्गी लागले आहे, असे वाटत असतानाच  या जागेवर पुन्हा  अतिक्रमण केले आहे. स्मशानभूमीच्या बांधकामासाठी खोदलेला पाया बुजवून टाकला आहे. चांगली बहरलेली झाडे तोडून टाकली आहेत. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने परळीचे तहसिलदार सुरेश शेजूळ यांच्याकडे  तक्रार करण्यात आली असून स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करणे, ग्रामपंचायतीने खोदलेला पाया बुजविने, झाडांची तोड करणे, गावात जाण्याच्या रस्त्यात दगड टाकून अडथळा करणे याबाबत संबंधित वयक्तीवर कारवाई करावी अशी मागणी,  ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रेत शेतावर जाळले....

वडखेल येथे अलिकडेच एका महिलेचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेले असल्याने या महिलेवर त्यांच्या मालकीच्या शेतावर अंत्यसंस्कार करावे लागले. या महिलेच्या पतीचे शेत गावाजवळ असल्याने ते शक्य झाले. पण ज्यांना शेतच नाही, किंवा ज्यांचे शेत गावापासून लांब आहे,  त्यांनी काय करावे, असा सवाल गावकरी विचारित आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार