MB NEWS-*असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप*

 असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      लालबावटा घर कामगार युनियन व बीड जिल्हा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

         या कार्यक्रमास जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले व 25 घर कामगार उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किरण सावजी यांची उपस्थिती होती. किरण सावजी व जालिंदर गिरी यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. परळी शहरातून घरकामगारांच्या इयत्ता दहावी मध्ये गुणानुक्रमे पहिल्या पाच मुलांना अकरावी व बारावीच्या वर्गासाठी वार्षिक एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचे घरकामगार युनियनचे अध्यक्ष बी.जी. खाडे यांनी जाहीर केले. घर कामगारांनी आपली नोंदणी संघटनेकडे करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी किरण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. शेख जावेद यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास 30 घर कामगार महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !