MB NEWS-पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास वैद्यनाथधाम प्रमाणे करावा-चेतन सौंदळे

 पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास वैद्यनाथधाम प्रमाणे करावा-चेतन सौंदळे

परळी वैजनाथ/प्रतिनिधी


       पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 12 जुलै 22 रोजी झारखंड राज्यातील देवघर येथील बाबा वैद्यनाथधाम चे दर्शन घेऊन विधीवत पुजा केली तसेच केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेसह सोळा हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले त्याचप्रमाणे द्वादश वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा अशी मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी केली आहे.

    भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह, विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, तीर्थक्षेत्र व ईतर ठिकाणी रेल्वेसेवा सुरू करणे तसेच उद्योग,व्यापार,रोजगार,स्वंय रोजगार,पर्यटन विकास तसेच विविध विकास कामांसाठी सोळा हजार कोटींचा विकासनिधी देण्यात आला आहे त्याचप्रमाणे वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळीचा विकास करण्यासाठीचा पाठपुरावा बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ.धनंजय मुंडे,पंकजाताई मुंडे,खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे तसेच श्री.वैजनाथ देवस्थान ट्रस्ट,परळी यांच्या मार्फत करणार असल्याची माहिती चेतन सौंदळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार