MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक*

 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक



विविध प्रश्नावर सिरसाळ्यात उद्या चक्का जाम आंदोलन- कॉ मुरलीधर नागरगोजे


परळी वै /  प्रतिनिधी


मागील वर्षी ३ काळे कृषी कायदे वापस घेल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाला शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जातील व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले नाही म्हणून रविवारी (ता३१) देशव्यापी "विश्वास घात" दिवस पाळुण सिरसाळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.


    एमएसपी ची केवळ घोषणा नको. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करा. केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात-निर्यात धोरण बदलून ते खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे करा. संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या. रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा. शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करा. यासह विविध मागण्सांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने रविवारी (ता.३०) सकाळी 11 वाजता सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ.भगवान बडे, कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ. महादेव शेरकर, कॉ.मनोज स्वामी, कॉ.संजय नवघरे, कॉ. मदन वाघमारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार