MB NEWS- नागापुर सब स्टेशनचे ट्रान्सफार्मर दुरूस्त करा - किसान सभा

 नागापुर सब स्टेशनचे ट्रान्सफार्मर दुरूस्त करा  - किसान सभा



परळी वै.ता.२९ प्रतिनिधी

      नागापुर ३३ के व्ही सब स्टेशन अंतर्गत नादुरूस्तत ट्रान्सफार्मर तात्काळ दुरूस्त करूण तात्काळ बसविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शुक्रवारी (ता.२९) वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यास देण्यात आले.

     नागापुर सब स्टेशनवर परिसरातील १५ गावांचा विज पुरवठयाचा भार आहे. पंधरा गावांना विज पुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. पाच एम ए चे दोन व ३.१५ एम ए चा एक असे तीन ट्रान्सफार्मर आहेत. त्यातील ३.१५ एम ए ट्रान्सफार्मर जळुन दोन वर्ष झाली आहेत. दोन ट्रान्सफार्मर वर तीन चा भार अयल्याने एक कायम नादुरूस्त होत असतो. त्यामुळे सर्व भार एकाच ट्रान्सफार्मरवर येत असल्याने त्यात सतत बीघाड होतो. त्यामुळे पावसाळा असुनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याच्या मोटारी सुरू झाल्यास वीज पुरवठा रहात नाही. त्यामुळे विज वितरण कंपनीने तात्काळ ट्रान्सफार्मर बसवावे अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा तीव्र आंदोलन करील असे निवेदन विज वितरणच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यास दिले आहे. निवेदनावर कॉ मुक्तेश्वर कडभाने, कॉ रूस्तुम माने, कॉ भगवान बडे, कॉ. गंगाधर पोटभरे, मदन वाघमारे, मनोज स्वामी, कॉ बाबा शेरकर, कॉ संजय नवघरे आदींच्या सहया आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !