MB NEWS- बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी लिहलेला अभिष्टचिंतन लेख>>>>> धनंजय मुंडे :परळी शहराचे भाग्यविधाते

 धनंजय मुंडे :परळी शहराचे भाग्यविधाते

        बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी 



 घराचे व मनाचे दरवाजे सर्वांसाठी सदैव खुले... सबंध परळी शहर म्हणजे माझे कुटुंब... परळी शहराची स्मार्ट सिटी घडवण्याचे ध्येय आणि या ध्येयपूर्ती प्रती कमालीचा उत्साह आणि निर्णयक्षमता.... धनंजयजी मुंडे साहेबांच्या परळीप्रती असलेल्या प्रेमात या बाबी समाविष्ट असल्याने भाग्यविधाता हा शब्दप्रयोग सर्वार्थाने सार्थ ठरतो. 


मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व सवंगडी काम करतो. अत्यंत कमी वयात व अल्पसंख्याक समाजातील असून सुद्धा साहेबानी मला नगराध्यक्ष होण्याची दिलेली संधी ही त्यांच्या सर्व जाती-धर्मांप्रती असलेल्या आदरभावाचे प्रतीक आहे. सर्वांना समान वागणूक, समान संधी आणि समान प्रेम आजवर साहेब देत आलेत व पुढेही ही सोशल इंजिनिअरिंगची परंपरा ते अबाधित ठेवतील यात तिळमात्र शंका नाही.


साहेबांच्या नेतृत्वात मागील 10 वर्ष नगर परिषदेत एकहाती सत्ता आहे, या दहा वर्षांपैकी सुरुवातीला माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर सारख्या वास्तू परळी शहरात साहेबांच्या दुरदृष्टीतून साकारल्या. 


घनशी नदीवर साखळी बंधारे बांधून साहेबानी जो नाथ जलपॅटर्न राबवला त्यातून आज पाणी ओसंडून वाहताना पाहून आनंद होतो. काळरात्री मंदिर परिसरात साकारलेल्या दसरा मैदानात, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये उभारलेल्या उद्यानांमध्ये आज होत असलेली गर्दी पाहून केलेल्या व करत असलेल्या कामांचे नक्किच साहेबांनाही समाधान वाटत असेल. 


साहेब एक वाचनालय असायला हवे, असे म्हणतात किती निधी लागेल भैय्या सांगा, आपण अमुक योजनेतून लगेच देऊन टाकू.... असं सांगून लगेच कामाला सुरुवात, अशी जबरदस्त निर्णयक्षमता साहेबांच्या ठायी आहे. त्यामुळेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकासाचा 133 कोटींचा आराखडा आज सत्यात उतरताना आपण पाहत आहोत. 


सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करून अद्ययावत पार्किंग व्यवस्था, उद्यान, भक्त निवास असा मोठा प्लॅन वैद्यनाथ विकास अंतर्गत प्रगतीपथावर आहे. परळी शहरात प्रत्येक जाती-धर्माच्या कार्यक्रमांना स्वतंत्र सभागृह असावे या भावनेतून साहेबानी सर्व जाती-धर्मांसाठी स्वतंत्र सभागृहे उभारली आहेत. 


साहेब प्रत्येक महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी, वेगवेगळे सण-उत्सव परळीत अभिनव पद्धतीने साजरे करतात. सर्व जाती-धर्मांप्रती आदर व स्नेह भाव राहावा यासाठी महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यातही अनोखी सोशल इंजिनिअरिंग साहेब साधत असतात. म्हणजे इथल्या भीम जयंतीचा मी अध्यक्ष असतो, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आमचे मुस्लिम सहकारी असतात. अशा अभिनव प्रयोगांमुळे साहेबांची लोकप्रियता कमालीची बहरत गेली आहे व पुढेही बहरत राहील. 


भांडणाचे गाव, राजकीय वादांचे व असुरक्षित गाव अशी परळीची प्रतिमा मालिन करण्याचे काही लोक प्रयत्न केत असतात, पण या शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा व समृद्ध करण्याचा प्रयत्न साहेब नेहमी करत असतात. त्यातूनच कधी छत्रपती संभाजी महाराजांचे महानाट्य, कवी संमेलन, दिवाळी पहाट, कव्वाली गायन, भीम गीतांचे कार्यक्रम, वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग, वैद्यनाथ महोत्सव, दुर्गोत्सव, ईद-मिलाप असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साहेब आयोजित करत असतात.


गरजूंना घरकुले असतील, निराधारांना आधार देणाऱ्या अर्थसहाय्य योजना असतील, यादी समोर आली की ती मंजूर होणारच, असा साहेबांचा स्वभाव आहे. मधल्या काळात राज्याचे मंत्री झाल्यानंतर साहेबानी बारामतीच्या धर्तीवर परळी शहर 100% झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येईल. 


साहेबांच्या मंत्री कार्यकाळात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले परळी शहर बायपासचे काम मार्गिच लागले नाही, तर आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. परळी ते अंबाजोगाई रस्ता देखील पूर्णत्वाकडे वाटचाल करतो आहे. परळी तर धर्मापुरी, परळी ते चांदापुर मार्गे पानगाव, परळी ते सिरसाळा या रस्त्यांचीही कामे सुरू झाली. या सर्वांचाच फायदा शहरवासीयांना होतो आहे. 


परळी शहराला पाणी पुरवणारे वाण धरण गाळमुक्त करून आता साहेबानी टोकवाडी येथे जलकुंभ उभारण्यास निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे शहरातला पाणीप्रश्न कायमचा संपून जाईल, त्याच बरोबर तालुक्यात नव्याने 11 लघु व मध्यम प्रकल्पांना मान्यता मिळाली असून या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात देखील आर्थिक समृद्धी येईल व पर्यायाने शहरातील व्यापरपेठ व अर्थकारणावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होईल!


आज घडीला शहरात नगरोत्थान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण केली जात आहेत, आचारसंहितेमुळे आज जरी ती थांबली असली तर शहरातील भूमिगत गटारे आणि उर्वरित रस्त्यांची कामे आगामी काळात पूर्ण करून शहर गटारमुक्त करून रस्ते चकाचक करण्याचे साहेबांचे ध्येय आहे.


शहरातील वीज वितरण व्यवस्थेवर काही प्रमाणात लोड असल्याने सहा महिन्यांपूर्वी साहेबांच्या प्रयत्नातून सर्किट हाऊस परिसरात एक 33/11 केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले. गिरवली येथेही एक सबस्टेशन मंजूर करण्यात आले असून ही दोन्ही सबस्टेशन सुरू झाल्यानंतर शहरातील विजेचा लपंडाव पूर्णपणे आटोक्यात येईल. 


रस्ते, नाल्या, वीज, पाणी केवळ हे पुरवणे म्हणजे स्मार्ट सिटी हे आदरणीय साहेबांचे ध्येय कधीच नाही, साहेबांच्या दृष्टीने ही सर्व कामे कर्तव्याचा भाग आहेत. परळी शहरातील प्रत्येक कुटुंबात समृद्धी व आर्थिक स्थैर्य यावे, त्यासाठी पूरक असलेल्या सुविधा निर्माण करणे, हे साहेबांचे खरे ध्येय आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. 


कोविडच्या काळात साहेबानी कवी नामदेव ढसाळ यांच्या 'सारं काही समष्टीसाठी' या उक्तीला सार्थ ठरवत लाखो रुपये खर्च करून 'सेवाधर्म' हा उपक्रम राबवला. कोविड संकटात इथल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी साहेबांनी कोविड सेंटर्स उभारले, रुग्णवाहिका दिल्या, तपासणी साठी येणाऱ्या लोकांना ये-जा करायला वाहने दिली, जेवणाचे डबे पुरवले, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिजन तपासणी यंत्र ते अगदी रेमडिसिव्हीर इंजेक्शन सुद्धा मोफत पुरवले, आजही त्या काळातील सेवाकार्य आठवले की साहेबांप्रति अभिमान व आदर वाटतो. एक एक रुग्णाची केलेली विचारपुसज त्यांना केलेली मदत व दिलेला आधार एक परळीकर या नात्याने आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. 


मागे एकदा जिजामाता उद्यान परिसरातील छोट्या खाद्य विक्रेत्यांची अडचण लक्षात येताच साहेबानी फूड प्लाझा ची संकल्पना राबवली, आज फूड प्लाझामुळे या भागात सर्व सामान्य कुटुंबांना पुण्यातील सारस् बागेचा आनंद परळीत मिळतो आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नवउद्योग निर्मिती, छोट्या उद्योगांना चालना देऊन परळीत सामान्य कुटुंबांचे अर्थकारण समृद्ध व्हावे या उद्देशाने साहेब सातत्याने प्रयत्नशील आहेत. आगामी काळात देखील रेल्वे ओव्हरब्रिजला समांतर ब्रिज उभारून रहदारी कमी करण्यासारख्या अनेक अभिनव संकल्पना साहेबांच्या मनात आहेत, त्यावर सविस्तर बोलूच, मात्र आज साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने परळी शहराच्या या भाग्यविधात्याच्या शहराप्रति असलेल्या प्रेमाला उजाळा देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न! 


आदरणीय धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. साहेबांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना..  

                    - © बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !