MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका

 लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात होर्डिंग्ज !



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका 

हैदराबाद, एमबी न्युज वृत्तसेवा.....

     माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या देशभरात मास लीडर म्हणून ओळखल्या जातात. नेहमीच त्यांच्या लोकप्रियतेची चुणुक विविध प्रसंगांमधून दिसून येते. महाराष्ट्र असो की मध्य प्रदेश, तेलंगणा असो की आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश असो की केरळ कुठेही जाऊ पंकजा मुंडेंची लोकप्रियता दिसून येते. अशाच प्रकारच्या लोकप्रियतेचा नमुना तेलंगणामध्येही दिसून येत आहे. आज दोन व उद्या तीन जुलै रोजी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैद्राबाद येथे होत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हैदराबाद मध्ये विजय संकल्प सभा होणार आहे.

       या संकल्प सभेच्या पूर्वतयारीसाठी तेलंगणाच्या विविध मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, नेत्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे अग्रेसर दिसुन येत असून ठीक ठिकाणी विजय संकल्प सभेच्या पूर्वतयारी बाबत मॅरेथॉन बैठका त्या घेण्यात सध्या व्यस्त आहेत. यादरम्यान पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेची झलक विविध ठिकाणी बघायला मिळत असून ज्या ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या त्या भागात पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे भव्य दिव्य होर्डिंग लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.  


  भारतीय जनता पक्षानं  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये होत आहे. या बैठकीच्या निमित्तानं ओवेसी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. भाजपाच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहेत.भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तब्बल 18 वर्षांनी हैदराबादमध्ये बैठक होत आहे. या बैठकीच्या नंतर विजय जनसंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाने कर्नाटकनंतर तेलंगणा या दक्षिण भारतामधील राज्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.विजय जनसंकल्प सभेच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या कारभाराला भाजपाकडून लक्ष्य केले जाईल. तेलंगणामध्ये 2023 साली विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यात स्वबळावर सत्तेमध्ये येण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे.

क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

      हैदराबादमध्ये आज 2 जुलैपासून भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दोन दिवस होणार आहे आणि मोदी 3 जुलै रोजी परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, नेते विविध मतदारसंघात स्थानिक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी,बैठका घेत आहेत.यामध्ये महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. ठीक ठिकाणी विजय संकल्प सभेच्या पूर्वतयारी बाबत मॅरेथॉन बैठका त्या घेण्यात सध्या व्यस्त आहेत. यादरम्यान पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेची झलक विविध ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठं मोठे होर्डिंग्ज लागलेले दिसुन येत आहेत.

    


  🛑 तेलंगणात या लागलेल्या स्वागताच्या होर्डिंग्जवरील मजकुराचा असा आहे मराठीतून स्वैरअनुवाद:-          👉👉👉👉

• ३ जुलै रोजी चलो हैदराबाद

पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांची

•विजय संकल्प सभा•

•चलो हैदराबाद! चलो हैदराबाद!चलो हैदराबाद

• विजय सभेच्या यशस्वीतेसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या पूर्वतयारी बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहत असलेल्या 

🔸भाजप राष्ट्रीय सचिव तथा माजी महिला बालकल्याण मंत्री महाराष्ट्र  मा. पंकज मुंडे यांचे  स्वागत - स्वागत -🔸

          स्वागतोत्सुक

डॉ  कोथापल्ली श्रीनिवास

जिल्हाध्यक्ष कुमारम भीम आसिफाबाद

भारतीय जनता पक्ष -सिरपूर मतदारसंघ, कुमुराम भीम आसिफाबाद जिल्हा

.-----------------------------------------------------------------

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

क्लिक करा:*अखेर उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा*

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !