*परळीत श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ*



*परळी/प्रतिनिधी*


वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा 121 वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास आज दिनांक 30 ऑगस्टपासून भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी , संत शिरोमणी मन्मथ स्वामी,.श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन श्री व सौ अमित चंद्रकांतआप्पा बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम दिनांक  5 सप्टेंबर पर्यंत होणार असून श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.


मागील दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे होवू न शकलेला श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात होत आहे. सप्ताहात अखंड शिवनाम, श्री गुरूलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

सोमवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात आरती व महाप्रसाद होईल त्याच दिवशी रात्री ठीक  8 वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघेल, रात्री  9वाजता पालखी वैद्यनाथ मंदिरात थांबणार असून दुसऱ्या दिवशी  सप्टेंबर मंगळवार रोजी श्रींची पालखी सकाळी  7 वाजता श्री वैद्यनाथ मंदिरातून निघून श्री वक्रेश्वर मंदिर येथे जाणार आहे तेथून सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक परळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघणार असून पालखीसोबत व पारायणासाठी समाजातील प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी  5 वाजता या पालखी मिरवणुकीचे विसर्जन श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात होणार असून तदनंतर आरती व महाप्रसाद होणार आहे. दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज सकाळी 7  ते 8  शिव सहस्त्रनामावली, सकाळी 9  ते 11 परमरहस्य व श्री पलसिद्ध महात्म्य पारायण श्री गुरु क्ष. प्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेड्रेकर सकाळी 10.30 ते 12 पर्यंत श्री मन्मथ स्वामी गाथावरील भजन दुपारी 3 ते  5 व शिव पाठ आरती सायंकाळी  5.30 ते 6.30 वाजेपर्यंत होणार आहे श्री गुरु 108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडेकर यांचे प्रवचन रात्री  8 ते 10 किर्तन असून तदनंतर जागर कार्यक्रम होणार आहे परम रहस्याचे पारायण प्रमुख शि.भ.प. व्यंकट मारुती आप्पा  होनशेटे हे करणार आहे.

या कार्यक्रमास वीरशैव समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गुरुलिंग स्वामी देवस्थान चे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी,सचिव अ‍ॅड.गिरीषअप्पा चौधरी, सदस्य प्रा.रामलिंगप्पा काटकर, रत्नेश्वरअप्पा कोरे, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे व समस्त वीरशैव समाज परळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार