भूमिपुत्र सन्मान सोहळा-2022 : संजय खाकरे सन्मानित


दिंद्रुड : जी. के. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आयोजित भूमिपुत्र सन्मान सोहळा-2022 या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परळीतील पत्रकार संजय खाकरे यांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
         मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा रंगला. यावेळी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतिराम घुले (क्रीडा), जागतिक कीर्तीचे पखवाजवादक पंडित उद्धव(बापू) आपेगावकर (कला आणि संस्कृती), चित्रपट अभिनेता सुहास सिरसट (अभिनय), प्रयोगशील शेतकरी कल्याण कुलकर्णी ( कृषी), यशस्वी तरूण उद्योजक प्रदीप ठोंबरे (उद्योग),  बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्थानकाच्या पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे ( प्रशासन), सरपंच ललिता व्हरकटे ( ग्रामीण विकास), पत्रकार विष्णू बुरगे ( पत्रकारिता- इलेक्ट्राॅनिक मीडिया), पत्रकार संजय खाकरे (पत्रकारिता- प्रिंट मीडिया), सामाजिक कार्यकर्त्या आयेशा शेख ( समाजकार्य) या प्रतिभावंतांना जी. के. फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.


       परळी शहरातील नामवंत पत्रकार व गेल्या २५ वर्षापासून पत्रकार म्हणून काम करीत सकारात्मक पत्रकारितेचा आयाम निर्माण करणारे पत्रकार संजय खाकरे यांचा यावेळी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !