अष्टविनायक दर्शन देखाव्याचे आज 3 वा.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम
 
परळी/ प्रतिनिधी-
दै.मराठवाडा  साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांची 8 मंदीरे, हुबेहुब मुर्ती, गुरुकुल व आधुनिक शिक्षण पद्धती असे देखावे सादर करण्यात येत आहेत.आज 3 वा.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते  उद्‌घाटन होणार आहे.


       मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी केली आहे. मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट व देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले परळी येथील राकेश चांडक व त्यांची शंभर जणांची टीम यावर्षी देखाव्याच्या तयारीसाठी कामाला लागली आहे. अष्टविनायक दर्शन ही यावर्षीची गणेशोत्सव देखाव्याची थीम असून एकाच मंडपात राज्यातील सर्व म्हणजे 8 प्रसिद्ध गणेश मंदीरे साकारली जात असून येथे  हुबेहुब मुर्तीसह गुरुकुल-आधुनिक शिक्षण पद्धतीने हा आगळा-वेगळा देखावाही सादर केला जात आहे. प्रत्येक श्रीगणेश भक्ताला परळीतच अष्टविनायकांचे मनोभावे दर्शन करता यावे हा यामागे उद्देश असल्याचे मार्गदर्शक तथा मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. 
आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखाव्याचा शुभारंभ
मराठवाडा साथी आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात येणाऱ्या अष्टविनायक दर्शन सोहळ्याचे उद्‌घाटन 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. औद्योगीक वसाहत सभागृहात होत आहे.  माजी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखाव्याचा शुभारंभ करण्यात येणार असून याचवेळी नवरात्रीनिमित्त नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माँ वैष्णोदेवीचा हुबेहुब व डोंगर, कपार तसेच वरुन पडणारा बर्फ असा देखावा सादर करण्यात येणार आहे. त्याचे भुमिपूजन याच कार्यक्रमात माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार