पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत

 *■ पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत*



● ऍड.अजय बुरांडेसह शिस्ट मंडळाने घेतली कृषी सचिवांची भेट


परळी / प्रतिनिधी


सण २०२० खरीप पीकविमा शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार दाखल केली नाही म्हणून विमा कंपनीने विमा देण्यास नाकारला होता त्यासाठी किसान सभेने मागील २ वर्षापासून शेतकऱ्यांची बाजू राज्य व केंद्र पातळीवर लावून धरली आहे.त्याचाच भाग म्हणून ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहे.


४ ऑगस्ट रोजी कृषी सचिव श्री. मनोज कुमार यांना भेटून शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तद्नंतर जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे देशाचं काम पाहतात असे कृषी सहसचिव श्री. रितेश चौहान यांची देखील भेट घेऊन जोरकसपणे शेतकऱ्यांची बाजू पुराव्यानिशी मांडली. यावेळी देशाचे कृषी सहसचिव श्री.चौहान यांनीआपण यावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. सोबतच संबंधित प्रकरणात विमा कंपन्यांचे असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेल्याने, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तात्काळ निर्णय घेणे उचित ठरणार नाही असे कळवले.


पुढील प्रयत्नांचा भाग म्हणून किसान सभा आज शुक्रवार दि 5 रोजी सर्वोच्च न्यायालयात, कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू ऐकावी यासाठी कायदेशीर पावलं उचलत असून, विधितज्ञांच्या भेटी-गाठी घेत, कायदेशीर सल्ला घेऊन सावध पावलं टाकत आहे. किसान सभेच्या दिल्लीत गेलेल्या या शिष्ठ मंडळाची  केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी गुरुवार दि 4 रोजी ठरलेली नियोजित भेट कृषी मंत्री आजारी असल्याने होऊ शकली नाही.शुक्रवार दि 5 रोजी पुन्हा एखादा हे शिष्टमंडळ कृषी मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय किसान सभा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.


पीक विमा प्रश्नी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने कॉम्रेड अजय बुरांडे, बीड जिल्हा किसान सभेचे सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड दत्ता डाके व जगदीश फरताडे बाजू मांडत आहेत, तर शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे हे करत आहेत.दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी व विविध केंद्रीय मंत्री यांना भेटीगाठीचे नियोजन व शिष्टमंडळाला लागेल ती मदत केरळचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. शिवदासन हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार