अचानक पाउस सुरु;वीज पडून महिला ठार तर नवरा जखमी


केज (दि. ३१) :-  केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे सायंकाळी ७:०० च्या दरम्यान वीज पडून एक महीला दगावली आहे तर तिचा पती जखमी झाला आहे.


या बाबतची माहिती अशी की, बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० च्या दरम्यान रामचंद्र चंद्रकांत आगे त्यांची पत्नी शिला रामचंद्र आगे आणि आत्माराम माणिक आगे व अन्नपूर्णा आत्माराम आगे हे शेतातील कामे आटोपून गावातोल गावाकडे येत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि अचानक विजेचा कडकडाट होऊन शिला रामचंद्र आगेवय (३५ वर्ष) हिच्या अंगावर विजेचा लोळ पडला यात तिचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या शेजारी असलेले तिचा नवरा रामचंद्र चंद्रकांत आगे वय (४० वर्ष) हे जखमी झाले आहेत तर आत्माराम माणिक आगे व अन्नपूर्णा आत्माराम आगे हे मात्र सुखरूप आहेत. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी तलाठी सोनवणे यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार राजू गुंजाळ यांनी उत्तरीय तपासणी व सहवं विच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

मयत शिला रामचंद्र आगे व जखमी तिचा पती रामचंद्र आगे या दांपत्यास एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्ये आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !