दोन कार धडकल्या:मुलाला दवाखान्यात घेऊन निघालेली महिला पोलीस व तिचा मुलगा मृत्युमुखी तर दोन जण जखमी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.तर पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे तसेच डॉक्टर डॉ. इलियास गंभीर जखमी झाले आहेत.
         जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दिंद्रुड येथून आलेली एम एच १४ , जि वाय ९११३, एस क्रॉस कंपनी ची पांढ-या रंगाची गाडी परळी कडे जात होती, जिच्या मध्ये दिंद्रुड पोलीस कर्मचारी होते.परळीहून एम एच ४७,०५३२६ काळवट रंगाची इंडीवर गाडी ज्यात परळी चे शासकीय डॉक्टर डॉ. इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालया समोर घडला. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकावर पडल्या आहेत.

• दरम्यान ,कोमल शिंदे आपल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात होत्या. कोमल शिंदे ह्या दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आजारी असल्याने त्या मुलाला उपचारासाठी परळीच्या दवाखान्यात निघाल्या होत्या.रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार