श्री राधाकृष्ण वेशभुषा स्पर्धेत कु. स्वरा लांडगे ने पटकाविला प्रथम क्रमांक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


       परळी शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री राधाकृष्ण वेश वेशभूषा स्पर्धेत संस्कार प्राथमिक विद्यालयातील पहिलीची विद्यार्थीनी कु. स्वरा श्रीराम लांडगे हिने प्रथम येण्याचा बहुमान मिळवत सुयश संपादन केले. 


        याविषयी अधिक माहिती अशी की, परळी शहर व तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या तथा सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संस्कार प्राथमिक विद्यालयाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत शाळेतील पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी महोत्सव व श्री राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेशभूषा स्पर्धेमध्ये शाळेतील पहिली व दुसरीच्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी श्री राधाकृष्नाच्या मनमोहक, बहुरंगी वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला. यावेळी परीक्षकांनी सर्व सहभागी चिमुकल्यांच्याआकर्षक वेशभूषांचे निरीक्षण करत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांची घोषणा केली.यावेळी राधेच्या वेशभूषेसाठी सर्वप्रथम कु. स्वरा लांडगे, द्वितीय आरोही नानवटे, तृतीय सिध्दी धुमाळ तर श्रीकृष्ण वेशभुशेसाठी प्रथम चैतन्य वळसे, द्वितीय व्यंकटेश भाले, तृतीय स्वप्निल पवार आदि स्पर्धकांची निवड करण्यात आली. कुमारी स्वरा लांडगे ही पत्रकार श्रीराम लांडगे यांची सुकन्या आहे.


        संस्कार शाळेच्या दहीहंडी महोत्सवासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि शाळेचे सचिव दीपक तांदळे, उद्घाटक म्हणून शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, पोलीस उपनिरीक्षक श्री. गीते, ख्यातनाम कलावंत लखन परळीकर, परळीभूषण श्रीमती गीते मॅडम, डॉ अलका गीते, तोष्णीवाल मॅडम, रमेश चौंडे तर परीक्षक म्हणून सुचिता करमाळकर व रश्मी भन्साळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या यशाबद्दल विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !