*प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागापूर सबस्टेशन येथे  33 केव्ही  ट्रांसफार्मर संदर्भात आंदोलन!*



*आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी नागापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे—प्रदीप मुंडे*


परळी वैजनाथ प्रतिनिधी


नागापूर सब स्टेशन मधील  33 के.व्ही. ट्रांसफार्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या हातची पिके वीज नसल्यामुळे पाण्याविना सुकून जात आहेत त्या संदर्भात नागापूर सबस्टेशन येथे दिनांक 2 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागापूर जि. प. गटाचे माजी सदस्य प्रदीप  मुंडे यांनी केले आहे.


   दरम्यान दिनांक 23 ऑगस्ट रोजी बातमी द्वारे आणि महावितरण कंपनीतील अधिकारी यांना ई-मेल द्वारे अधिकृत पणे कळविण्यात आले होते. नागापूर गटाचे माजी जि प सदस्य प्रदीप  मुंडे  यांनी महावितरण अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि त्या संदर्भात निवेदनही दिले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


   गेल्या दीड महिन्यापासून नागापूर सबस्टेशन मधील एक ट्रांसफार्मर दुरुस्ती विना बंद आहे तर दुसरा ट्रांसफार्मर जळाल्यामुळे बंद आहे त्यामुळे परिसरातील नागापूर, बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वानटाकळी ,अस्वलआंबा, मांडेखेल ,नागपिंपरी, तडोळी, माळहिवरा ,गोपाळपूर , आदी गावातील शेतकरी विजेविना त्रस्त आहेत.


   सध्या गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारली आहे त्यामुळे पिके सुकून जात आहेत पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा बंद आहे त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे परिणामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतामध्ये ऊस सोयाबीन कापूस हरभरा उडीद मूग ज्वारी बाजरी आधी पिके असून पाण्याविना जळून खाक होत आहेत.


   महावितरण कार्यालयातील अधिकारी यांना संपर्क केला असता शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत शेतकऱ्यांना हीन प्रकारची वागणूक अधिकाऱ्याकडून मिळत आहे. या अगोदरही दोन आंदोलने ट्रांसफार्मर मिळवण्यासाठी नागापूर गटाचे माजी जि प सदस्य प्रदीप  मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांना एक ट्रांसफार्मर मिळाला होता परंतु लोडमुळे तोही ट्रांसफार्मर जळाला आहे.


   यासंदर्भात दिनांक 2 सप्टेंबर 2022 वार शुक्रवार रोजी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नागापूर सब स्टेशन येथे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हक्काच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागापूर गटाचे माजी जि. प. सदस्य प्रदीप मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार