युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

पंकजाताईंच्या संकल्पनेतून स्थानिकांच्या कलागुणांना वाव : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गौरी - गणपती महोत्सव स्पर्धा:आकर्षक बक्षिसं 








परळी वैजनाथ.......

स्थानिक कलाकार आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव देणारा गौरी गणपती स्पर्धा महोत्सव  यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवातंर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह विविध आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. 

 शहरात चांगल्या प्रकारे सांस्कृतिक चळवळ रूजावी तसेच स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम  सुरू केलेला आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे हा उपक्रम घेता आला नव्हता पण आता यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने हया स्पर्धा घेण्यात येत आहेत.  

      या स्पर्धा महोत्सवा अंतर्गत बाल गणेश मंडळ, घरगुती गणेश सजावट, महालक्ष्मी मखर सजावट आणि देखावा, मंगलमूर्ती मिरवणूक देखावा या स्पर्धा होणार आहेत. महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस  डबल डोअर फ्रिज, द्वितीय मायक्रोवेव्ह, तृतीय स्मार्ट फोन तर दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना टोस्टर देण्यात येणार आहे. बाल गणेश मंडळ स्पर्धेसाठी प्रथम- नऊ हजार रुपये, द्वितीय सात हजार व तृतीय चार हजार रुपये तर उत्तेजनार्थ दोन हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे तर घरगुती गणेश सजावट आणि मंगलमुर्ती मिरवणूक देखावा स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ९ हजार, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ ३ हजार रूपये बक्षिसं दिली जाणार आहेत.  सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे.  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या