शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या शुभारंभ


परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी)

          येथे श्री.शनैश्वर प्रतिष्ठान संचलित श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा गुरुवारी (ता.०१) भव्य शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभ कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष वैजनाथ बेंडे व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

                   येथील श्री.शनैश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असते.या संस्थेने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सेठ सामत, राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, लोकमान्य पथसंस्थेचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सावरकर पथसंस्थेचे चेअरमन बाजीराव धर्माधिकारी, जागृती मल्टिस्टेटचे चेअरमन गंगाधर शेळके, शनी मंदिर देवस्थान सचिव शंकरअप्पा उदगीरकर, कोलुघाणा सेवा सहकारीसोसायटी चे सचिव विठ्ठलअप्पा चौधरी, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे कल्याण अधिकारी दिलीप वंजारी,जेष्ट उद्योजक प्रेमनाथ फकिरे, कोलूघाणा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश लांडगे, मप्रांतिकचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके,शनी मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शिवा लांडगे, वैजनाथ कोल्हे, अरविंद येरणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.०१) सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी सर्व नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष, संचालकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार