युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 परळी वकील सघांच्या अध्यक्षपदी अँड.नागरगोजे तर सचिवपदी अँड पारेकर यांची निवड 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

       परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधीज्ञ श्री. अँड. व्हि.बी.नागरगोजे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली.  

       परळी वकील संघाचे सन 2022-2023 या वर्षी करिता वार्षिक निवडणूक घेण्यात आली.निवडणूकीत अध्यक्षपदी श्री. व्हि.बी.नागरगोजे यांनी बाजी मारली.यावर्षी पहिल्यांदाच अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. यावेळी सचिवपदी  अँड. गजानन पारेकर व उपाध्यक्ष पदी अँड.बुद्धभुषण उजगरे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी अँड व्हि बी घुले तर सहसचिव पदी अँड ए.ए.शेख यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.एच.व्ही.गुट्टे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड. राहुल सोळंके यांनी काम पहिले. विजयी पदाधिकारी यांचे अँड.आर.व्हि.गित्ते अँड.प्रकाश मराठे  अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड.नागापूरकर अँड.जीवनराव देशमुख अँड.अनिल मुंडे  अँड.डि.पी.कडबाने अँड अविनाश पवार अँड विलास बडे अँड.प्रदिप गिराम. अँड लक्षमण अघाव अँड.दत्तात्रय आंधळे  अँड.दत्ता कराड अँँड. सचिन सोळंके अँड बाळासाहेब मुंडे अँड शशीकांत काजळे अँड मनजित सुगरे अँड.कल्याण सटाले अँड संजय रोडे अँड.मार्तँग शिंदे अँड.लक्षमण गित्ते अँड.ज्ञानोबा मुंडे अँड राज इरफान अँड.अमोल सोंळके अँड. मोहन कराड अँँड. सायस मुंडे अँड सचिन सोळंके अँड.जगतकर अँड सोनेराव सातभाई  अँड.गिरीश नरवणे अँड.प्रल्हाद फड.अँड.सुनिल सोनपीर अँड.राहुल सोळंके अँड.धनाजी कांबळे अँड. अँड.दिनकर वाघमोडे  अँड.केशव अघाव अँड.महरूद्र कराड ईत्यादी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या