परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- *हर घर तिरंगा:परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने रॅलीने तिरंगा वितरण*

 हर घर तिरंगा:परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने रॅलीने तिरंगा वितरण



परळी (प्रतिनिधी) - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून, यांतर्गत आज दि. 12 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी  शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅलीने ध्वज वितरित करण्यात आले.

        गणेशपार येथुन या  तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकार गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपूरा बंगला, हनुमान नगर, नादुरवेस, अंबेबेस, भोईगल्ली आदी भागात ध्वज  व ध्वजसंहिता माहितीपत्रक वितरण करण्यात आले.



   यावेळी उत्तमराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, जाबेर खान पठाण,वैजनाथ सोळंके,प्रा.विनोद जगतकर, श्रीकांत मांडे, वैजनाथ बागवाले,अनिल अष्टेकर, लालाखान पढाण,सय्यद सिराज, गोविंद कुकर,मुन्ना बागवाले,चंद्रप्रकाश हालगे,प्रताप समिंदरसाळवे, नितीन बागवाले,राज जगतकर, राहुल जगतकर, शरद कावरे,शरद चव्हाण, शशी बिराजदार, मुन्ना बारस्कर,अभिजित तांदळे, विष्णू साखरे,चेतन बागवाले, चारुदत्त करमाळकर,अमर रोडे,तहसीन नवाब, अझमदखान पठाण,वैजनाथ जोशी, जितेंद्र नव्हाडे, राजाभाऊ गावडे,अनिल घेवारे,कृष्णा डुबे,शोयब, पत्रकार अनंत पप्पू कुलकर्णी,महेश वडगांवकर, अखील भाई, कैलास शिंदे,मजास  इनामदार, अन्सार शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!