MB NEWS-श्री.भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त विजय ग्रंथ पारायणास उत्साहात सुरुवात

 श्री.भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त विजय ग्रंथ पारायणास उत्साहात सुरुवात



परळी /प्रतिनिधी: आद्य वस्त्र निर्माते शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव येत्या १० ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहान साजरा होत असून त्यानिमित्त विजय ग्रंथ पारायणास संत श्री जगमित्र नागा मंदिरात आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.


स्वकुळ समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव श्रावण शुद्ध १३, बुधवार १० ऑगस्ट रोजी येतो आहे. यानिमित्त शहरातील साळी समाज बांधवांच्या वतीने विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी संत श्री जगमित्र नागा मंदिर येथे  भगवान श्री जिव्हेश्वरांची आरती करून पारंपारिक पद्धतीने ग्रंथ पारायण सुरुवात झाली. या ग्रंथ पारायणास महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. देशभरात विखुरलेला साळी  (विणकर) समाज भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवां निमित्त एकत्र येत असतो.विजय ग्रंथ पारायण प्रारंभ आणि श्री पूजेनिमित्त शहरातील आणि परिसरातील असंख्य समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान जन्मोत्सवाच्या दिवशी हरिभक्त परायण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे कीर्तनही सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. समाजातील विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सत्कार ही आयोजित करण्यात आला आहे.


पारायणाच्या समाप्तीच्या दिवशीच भगवान श्री जिव्हेश्वर चा जन्मोत्सव पहाटे ६ वा.१३ मिनिटांनी साजरा होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार असल्याची माहिती स्वकुळ साळी समाजाचे  विलासराव ताटे,धनंजय आरबूने, बालासाहेब पोरे, ज्ञानोबा घटे, बालासाहेब बनसोडे,नामदेव आरबूने, बालासाहेब बडकस,यांनी दिली.या वेळी पारायण कर्त्या सौ.स्वाती ताटे, सौ.वैजयंती इंगळे, सौ मानकर , सारिका आरबूने, सौ.मंजुषा पोरे, सौ.आरती आरबूने, सौ.मिरा घटे, श्रीमती भंडारे, आदी सह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बालासाहेब पोरे, धनज्ञानोबा घटे, बालासाहेब बनसोडे,नामदेव आरबूने, बालासाहेब बडकस,यांनी दिली.या वेळी पारायण कर्त्या सौ.वैजयंती इंगळे, सौ मानकर , सारिका आरबूने, सौ.मंजुषा पोरे, सौ.आरती आरबूने, सौ.मिरा घटे, श्रीमती भंडारे, आदी सह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------------------------------------------------

Video News :






------------------------------------------------------









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !