MB NEWS-*ताईंना मंत्रीपद मिळत असेल व या भागाचा विकास होणार असेल तर आनंदच - धनंजय मुंडे*

ताईंना मंत्रीपद मिळत असेल व या भागाचा विकास होणार असेल तर आनंदच - धनंजय मुंडे

परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....
       पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळेल का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना  मंत्रिपद देणे अथवा न देणे हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र ताईला मंत्रिपद मिळाले व या भागाचा विकास होणार असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

       धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेज वरील डोंगरावर राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारले असून, याठिकाणी मराठवाड्यातील सर्वात उंच, तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. या तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. 


या समारंभात बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की,परळी मतदारसंघाचा विकासात्मक व राजकीय दर्जा वाढवून परळीचा नावलौकिक व दबदबा दिल्लीत आणि मुंबईत वाढावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असले तरी आम्ही मात्र काही महिने अगोदरच या विशाल तिरंगा ध्वज उभारणीचे व 15 ऑगस्ट च्या काळात लोकार्पण करण्याचे नियोजन केले होते. परळीत येणाऱ्या प्रत्येकाला या स्थळाची भुरळ पडेल, असे काम केले जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.




         या कार्यक्रमास माजी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर, रा. कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण,  लक्ष्मणर पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती नेरकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक सुंदर बोंदर, बीडीओ संजय केंद्रे, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सुरेश चाटे, स.पो.नि. महेंद्रसिंह ठाकूर, तालुका वनाधिकारी भगवान गित्ते, महसूल, पोलीस आदी विभागाचे कर्मचारी, प्राध्यापक वृंद, यांसह पदाधिकारी, अधिकारी -कर्मचारी, एनसीसी चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व परळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. ध्वज फडकण्यासाठी इलेक्ट्रिक पद्धतीने 13 मिनिटे लागल्यानंतर अत्यंत डौलाने अतिविशाल तिरंगा फडकताना पाहून उत्साह संचारणारे वातावरण तयार झाले होते; त्यात भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी, तिरंगा धारक लहानगे विद्यार्थी, पोलिसांचे बँड पथक, वैद्यनाथ महाविद्यालयातील एनसीसी पथक आदी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
---------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार