इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच: काल विद्यानगरला तर आज माधवबाग भागात घरफोडीची नोंद

 परळीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच: काल विद्यानगरला तर आज माधवबाग भागात घरफोडीची नोंद 




 परळी वैजनाथ/प्रतिनिधी......


       दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व  परिसरात चोरीच्या घटना सुरूच आहेत.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन काल चोरीची मोठी घटना विद्यानगर भागात घडली.तर आज जवळच्याच माधवबाग भागात चोरी झाली.या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   


        सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद  होत आहे. दि.3 रोजी माधवबाग भागात फिर्यादी मुक्ता श्रीहरि सानप यांच्या घरी चोरी झाली आहे. घरात अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील  कपाटाचे लॉक उघडुन कपाटातील 90 हजार रुपये  लंपास केले.याप्रकरणी परळीत संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट