युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-भाजप प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे

 भाजप प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे



मुंबई- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.तसेच भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा होती.विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपच्या अध्यक्षपदी माजीमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे यांची तसेच मुंबई भाजप अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


-------------------------------------------------------

विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇
-------------------------------------------------------

Video News :


Clik: ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह*


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*


Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या