MB NEWS-परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघ : सोनपेठ तालुकाध्यक्षपदी आर.एल. मुंडे यांची बिनविरोध निवड

 परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघ : सोनपेठ तालुकाध्यक्षपदी आर.एल. मुंडे यांची बिनविरोध निवड



सोनपेठ, प्रतिनिधी.....
      परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्यकारिणीच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी भाई उध्वराव पाटील विद्यालय, उक्कडगाव (म) चे मुख्याध्यापक आर.एल. मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
     परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघाची आज दिनांक 06/08 /2022 रोजी महत्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत  भाई उद्धवराव पाटील विद्यालय उक्कडगाव(म) येथील मुख्याध्यापक श्री. मुंडे आर. एल. यांची सोनपेठ तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.  तर उपाध्यक्षपदी श्री माधवाश्रम विद्यामंदिर खडका चे  मुख्याध्यापक श्री.आर.एम.बुरांडे, श्री मुक्तेश्वर माध्य. विद्यालय, सोनपेठ चे मुख्याध्यापक राधेशाम बबनराव कुरे यांची निवड झाली. सचिवपदी श्री. किर्तेश्वर माध्य. विद्यालय आवलगावचे मुख्याध्यापक श्री.अशोक भगवानराव शिंदे यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष उमाटे सर तर सचिव भांगे सर व सर्व सोनपेठ तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
         उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव श्री. संजय भानुदास होके,कोषाध्यक्ष अंकुश बालासाहेब परांडे,कार्यकारिणी सदस्यपदी पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी,राजकुमार लक्ष्मणराव धबडे,दत्तात्रय रामकिशन जोगदंड,देविदास लक्ष्मणराव सोनकांबळे,शिवाजी रामराव तळेकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

---------------------------------------------------------

Video News :







------------------------------------------------------









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार