MB NEWS-मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला म्हणून आईचा खून; पाच पैकी दोघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी

 मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला म्हणून आईचा खून; पाच पैकी दोघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी




अंबाजोगाई - परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आईचा खून केल्याची घटना  सोमवारी घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय क्रंमाक 1 चे न्या.डी.डी.कोचे यांच्या समोर हजर केले असता दोघांना 11 तारखेपर्यंत (आठ दिवसाची) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपीचा तपास ग्रामिण पोलिस करीत आहेत.
अंबाजोगाई ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील अनिता राठोड व वैजनाथ राठोड हे कुटूंब आठ दिवसापुर्वी तिरूपतीच्या बालाजी दर्शनासाठी गेले होते. आई-वडील देव-दर्शनासाठी गेल्यामुळे त्यांच्या तीन मुली आपल्या घरीच राहत होत्या. याच तांड्यावरील बबन चव्हाण याने त्यांच्या अल्पवयीन मुलीस विनाकारण भेटून छेडछाड करत होता. व काही दिवस त्रास देखील दिला. आई-वडील देवदर्शनाहून आल्यानंतर हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर आई अनिला राठोड व वडील वैजनाथ राठोड यांनी बबन चव्हाण यास जाब विचारला त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. याचा राग मनात धरून सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बबन चव्हाण व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण, भाऊ सचिन चव्हाण इतर तिघांनी राठोड कुटूंबियांच्या घरी जावून भांडण करण्यास सुरू केली. पिडीत वडीलास मारहाण होवू नये म्हणून पत्नीने त्यांना एका रूममध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. त्यावेळी आरोपींनी दुसर्‍या रूममध्ये असलेल्या आई अनिला राठोड यांच्याकडे मोर्चा वळून त्यांच्या पोटात हत्याराने वार करून डोक्यात लाकडाने वार करून गंभीर जखमी केले. राठोड यांच्या घरातील आरडाओरड पाहून शेजार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेताच आरोपींनी तेथून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या अनिता चव्हाण यांना स्वाराती रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टराने त्यांना मयत घोषित केले. सदरील घटना घडल्यानंतर अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण ठाण्याचे पोलिस निरिक्षक वासुदेव मोरे, पी.एस.आय.श्रीनिवास सावंत, विठ्ठल केंद्रे यांच्यासह ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. यात खूनातील आरोपी बबन चव्हाण व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण हे परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय क्रं.1 चे न्या.डी.डी.कोचे यांच्यासमोर हजर केले असता इतर तिन आरोपींना शस्त्र जप्त करण्यासाठी न्यायालयाने दोघांना 11 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कोठडी दरम्यान या खून प्रकरणामध्ये आणखीन किती आरोपी सहभागी आहेत. याचा तपास ग्रामिण पोलिस करणार आहेत. मृत महिलेचा अंतविधी मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात करण्यात आला. या दरम्यान अनूचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामिण पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार