MB NEWS-अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ

अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ



परळी (प्रतिनिधी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समाजामध्ये जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला, तर समाजात भाईचाऱ्याची भावना निर्माण होईल असे प्रतिपादन परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक लक्ष्मण वैराळ हे होते. यावेळी वैराळ यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले ,अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजिक एकोपा निर्माण व्हावा आणि समाजातील जातीय, वर्गीय विषमता नष्ट व्हावी आणि यासाठी अट्टहास धरला त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.

यावेळही उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमासाठी सपोनी शिवाजी पोळ,पोलीस नवनाथ हरेगावकर, प्रकाश वाघमारे, लक्ष्मण टोले, व्यंकट डोरनाळे, सुनिल अन्नमवार, भाग्यश्री डाके,पत्रकार भगवान साकसमुद्रे, विक्रम मिसाळ, बबन कसबे, अभिमान मस्के, कैलास डूमने, पद्माकर उखलीकर व ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !