MB NEWS-अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे

 अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे



*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अजय मुंडे यांचे प्रतिपादन, ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात केले अभिवादन*



परळी (दि. 1) - ज्यांचं पोट भरलेलं असतं, त्यांना वेदनांची जाणीव नसते, त्यांच्या लेखनात विनोद दिसू शकतो, मात्र ज्यांचं पोट उपाशी असतं, त्यांच्या पोटातून क्रांतीच्या ठिणग्या पडतात, अशा केवळ विचार व साहित्यातून सामाजिक ठिणग्या पाडून सामाजिक क्रांती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन युवा नेते अजय मुंडे यांनी केले आहे.


दि. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अजय मुंडे यांनी अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांयाना शुभेच्छा दिल्या. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, मुंबईतील चिराग नगर यासह पुणे व अन्य प्रस्तावित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारले जावे, यासाठी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे साहेबानी प्रयत्न केले, मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाने त्यांच्या या भूमिकेस फारसे यश येऊ शकले नाही. आम्ही धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून आगामी काळात ही भूमिका रस्त्यावर येऊन मांडणार आहोत, अशी भूमिका अजय मुंडे यांनी मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !