परळीतील बहुचर्चित व्यापारी अपहरण प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह परळी पोलिसांनी पकडले- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा..... परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमाला सह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवाल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की, पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2),140(2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन. एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी बे.ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद द...
उत्तम आयोजन योग्य प्रसार
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा