परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
श्रावणानिमित्त परळीत आठवडाभर वेदज्ञान कथा
---पं. रामनिवासजी गुणग्राहक व पं. उदयवीर आर्य यांच्या भजन व व्याख्यानांची पर्वणी---
परळी वैजनाथ--(दि.४)-
मानवी जीवनाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक व एकूणच सर्वांगीण कल्याणासाठी वेदज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने आज (दि.५) पासून श्रावणी वेदज्ञान कथेला प्रारंभ होत असून याकरिता भरतपुर (राजस्थान) येथील वैदिक विद्वान पं. रामनिवासजी गुणग्राहक व मथुरा येथील भजन गायक पं. उदयवीर आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. परळी शहर आणि परिसरातील धार्मिक व अध्यात्मप्रेमी नागरिकांसाठी ही प्रवचने व भजन संगीताचे कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे आत्मिक आनंदाची पर्वणी ठरणार आहेत.
यानिमित्त शहरातील आर्य समाज मंदिरात दररोज स.७.३० वाजता वैदिक यज्ञ संपन्न होईल. यात विविध मान्यवर यजमान म्हणून सपत्नीक सहभागी होणार आहेत. नंतर ८.३० वाजता भक्तिमय भजन संगीताचा कार्यक्रम, तर ९.१५ वाजता आध्यात्मिक प्रवचने संपन्न होतील. तसेच रात्री ८ ते १० वाजता सामाजिक व राष्ट्रीय विषयावर भजन कीर्तन व व्याख्यानाचे कार्यक्रम पार पडतील.
त्याचबरोबर दररोज विविध शाळा- महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम ही पार पडणार आहेत. तर दुपारी आर्य समाजात ४ वा. जिज्ञासू मंडळींसाठी "शंका समाधान" हा कार्यक्रम पार पडेल. हा कार्यक्रम गुरुवार दि.११ ऑगस्ट पर्यंत चालणार असून पौर्णिमेदिनी या कार्यक्रमाची सांगता होईल.
तरी या कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य समाज परळीचे प्रधान जुगलकिशोर लोहिया, मंत्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा