MB NEWS-पिस्तूलचा धाक दाखवून जबरी दरोडा

 पिस्तूलचा धाक दाखवून जबरी दरोडा



बीड: तालुक्यातील लिंबागणेश जवळ असलेल्या वडवाडी येथे काल मध्यरात्री अज्ञात 8 ते 10 दरोडेखोरांनी बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांच्या कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले.

        कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांच्या कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले. या घटनेने बालाघाटावर खळबळ उडाली असून घटनेची माहिती देताच नेकनूर व एलसीबी च्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.


या धाडसी दरोड्यानंतर जिल्हा पोलीस दलाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या ठिकाणावरून श्वानाने माग काढला आहे. दरम्यान, या संस्था परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून प्रकारणाचा तपास लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर आहे.

असा झाला दरोडा...

अभिमान आवचार यांना काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांना मारहाण करत पिस्तोल लावले व अंगावरील सोने काढून घेत पैसे कुठे ठेवले आहेत हे विचारले जर सांगितले नाही तर सहा गोळ्या घालू अशी धमकी दिली. याच दरम्यान चोरट्यांनी अभिमान अवचर  यांच्या पत्नी सत्वशीला अवचर यांना एका बाजूला बांधून ठेवले होते. त्यांच्या अंगावरील सुद्धा सोने चोरट्यांनी काढून घेतले.  जवळपास एक तास हा प्रकार चालू होता. पिस्तुलाचा धाक दाखवून व मारहाण करत चोरट्यांनी अवचर कुटुंबाकडून नऊ लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घेऊन पोबारा केला. त्यानंतर आरडाओरडा झाल्याने जवळ असणाऱ्या खोलीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण बाहेरून कडी लावल्याने त्यांना लवकर बाहेर येता आले नाही. काही वेळानंतर  कर्मचारी अवचर यांच्या घरात आले असता त्यांना सत्वशीला अवचर  यांना बांधून ठेवून अभिमान अवचर  यांना मारहाण करीत दरोडा पडल्याचे लक्षात आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार