परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नाही; नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी करणार पुन्हा आमरण उपोषण*
परळी : परळी नगर परिषदेतील 52 सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी रजा रोखीकरण व उपदानाची रक्कम मिळावी म्हणून नगर परिषदेसमोर भर पावसात आमरण उपोषणास बसले होते. मुख्याधिकारी बोंदर यांनी रजा रोखीकरणाच्या 30 टक्के रक्कम दोन दिवसात अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दोन महिन्यात व सर्व उर्वरित रजा रोखीकरण व उपदान मार्च 2023 पर्यंत देण्याचे लेखी दिले होते.परंतु या अश्वाानाची पूर्तता केली नाही त्यामुळे नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत.
लेखी आश्वासना नुसार सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाच्या 30 टक्के रक्कम देण्यात आली नाही. 38 कर्मचाऱ्यांना रक्कम दिली पण तीही कमी देण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी म्हणून 38 कर्मचाऱ्यांनी दिनांक 10 ऑगस्ट पासून पुन्हा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांची दिनांक 2 ऑगस्ट रोजी भेट घेतली व चार दिवसात आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी केली. ही मागणी मान्य न केल्यास 10 ऑगस्ट असून सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषण करतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी अध्यक्ष बी.जी. खाडे, सरचिटणीस जगन्नाथ शहाणे, किरण सावजी, त्रिंबक शिंदे, नारायण भोसले, बन्सी हजारे, सुग्रीव शिनगारे, उत्तम सावजी यांच्यासह 20 ते 25 सेवानिवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा