इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने स्कुल बॅगचे वाटप

 बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने स्कुल बॅगचे वाटप




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ विद्यालय व डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळा येथे नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्याना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ विद्यालय व डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळा या ठिकाणी गरजु विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे,माजी सभापती वैजनाथअण्णा बागवाले, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटना शहराध्यक्ष अजय जोशी सर, जयराज देशमुख,संजय गांधी निराधार समिती सदस्य लालाखान पढाण, इम्रान सर,राहुल ताटे,शशी बिराजदार, चारुदत्त करमाळकर,किरण सावजी,अझमद खान, अभिजित तांदळे, अनिल घेवारे,मझरभाई पढाण,थळकरी चाचा  वैद्यनाथ विद्यालय चे मुख्याध्यापक हंगरगे सर, डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका मुनवरी पढाण मॅडम,सिद्दीकी झरीना मॅडम, वैद्यनाथ शाळेचे शिक्षक पापा सर, राजेश साखरेसर, अमोल डाभीकर सर,चौधरी मॅडम,ईटके मॅडम,शेटे मॅडम,परवेज देशमुख सय्यद सईद ,सय्यद इस्तियाक,अय्युब काकर,सय्यद बाकर,सय्यद याकुब,लहु हालगे व शुभम इत्यादी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!