MB NEWS- *अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून बलात्कार करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड*

 अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून बलात्कार: आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड



*अंबाजोगाई* .....येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्री. डी. डी. खोचे साहेब यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लै. प्र. केस नं. २४/२०१७, महाराष्ट्र शासन वि. बाळासाहेब वळसे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला.


या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे, रा. वळसे वस्ती, ता. केज, जि. बीड याने अल्पवयीन पिडीत मुलगी मेंहदी क्लासला जात असताना आरोपीने तीस बळजबरीने स्कॉर्पिओ जीप तोंड दाबून बळजबरीने बसवून पळवून नेवून तिस पूणे येथे एक महिना ठेवून तिचे सोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. वगैरे फिर्यादीवरून दि. २६/०४/२०१७ रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. १९९/२०१७, कलम - ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा.द.वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपास पो. निरीक्षक आर. जी. गाडेवाड यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले..


सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला.


या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. रामेश्वर एम. ढेले व त्यांना मार्गदर्शन वरीष्ठ सरकारी वकील ॲड. अशोक व्ही कुलकर्णी यांनी केले आणि ॲड.नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार