परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शहरात हरघर तिरंगा अभियान यशस्वी करा-मुख्याधिकारी सुंदर बोंदर
परळी वैजनाथ ता.०३ (प्रतिनिधी)
केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने १३ आँगस्ट ते १५ आँगस्ट दरम्यान हर घर झेंडा अभियानासह अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवारी (ता.०३) नियोजनासंदर्भात नगरपालिकेच्या वतीने सभागृहात शहरातील विविध संस्था, पक्ष, संघटना यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम व हर घर झेंडा अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. हर घर झेंडा अभियान १३ आँगस्ट ते १५ आँगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जनजागृती व शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील विविध संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संस्था, शाळा,महाविद्यालय, व्यापारी मंडळ यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या बैठकीत मुख्याधिकारी श्री बोंदर यांनी हरघर झेंडा अभियान राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, नगरपालिका यासंदर्भात जनजागृती करत आहे, मात्र सर्वांनी सहकार्य केल्यास हे अभियान यशस्वीपणे राबवता येईल व शहरातील प्रत्येक घरावर देशाचा अभिमान असलेला तिरंगा डोलाने फडकेल असे मत यावेळी व्यक्त केले तसेच त्यांनी राष्ट्रध्वजाची संहिता व तो घरावर कसा लावला जावा यासंदर्भात माहिती दिली. यावेळी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे, शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा