MB NEWS-गावी निघालेला युवक अपघातात ठार

 गावी निघालेला युवक  अपघातात ठार 



गेवराई .....

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुचाकीवरुन गावी निघालेल्या तरुणाला टेम्पोने जोराची धडक दिली, त्यानंतर तो उडून रस्त्यावर पडला.यावेळी भरधाव टिप्परने त्यास चिरडले. ही हृदयद्रावक घटना पुणे- नगर रोडवरील रांजणगावजवळ घडली. सुनील भगवान डुकरे (२८,रा.सिरसमार्ग ता.गेवराई) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रांजणगाव (जि.पुणे) येथे खासगी कंपनीत नोकरी करायचा.

सिरसमार्ग येथे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तो दुचाकीवरुन ४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता गावी निघाला होता. रांजणगावजवळ भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली , यानंतर तो रस्त्यावर कोसळला. याचदरम्यान समोरुन येणारे टिप्पर त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ व नातेवाईकांनी रांजणगावला धाव घेतली. सायंकाळी सिरसमार्ग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

---------------------------------------------------------

Video News :








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार