मिरवट ग्रामस्थांचा आदर्श:जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!

मिरवट ग्रामस्थांचा आदर्श: जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       जिल्हा परिषदेची शाळा ही खऱ्या अर्थाने गावची शाळा असते आणि या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे गावच्या भविष्यातील पिढ्यांचा विकास असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही शाळेसाठी आमच्या सर्वांच्या खिशातून रुपये 3 लाख 50 हजार रुपये मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करत आहोत असे म्हणत मिरवट तालुका परळी वैजनाथ येथील गावकऱ्यांनी शाळेप्रती आपली आपुलकी व्यक्त केली.

क्लिक करा व पहा: धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांच्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे असे मुख्याध्यापक श्री हाडबे  टी. एन. आणि शिक्षकांनी गावकऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी निधी जमा केला. आपल्या गावचे सर्व शिक्षक अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करत असून त्यांना काही भौतिक सुविधा कमी पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर मिरवट येथील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शाळेच्या विकासासाठी निधी जमा केला. 

Click&watch:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

या जमा केलेल्या शैक्षणिक निधीतून सध्या शाळेच्या प्रांगणात पेविंग ब्लॉक्स बसवण्यात आले असून त्यामुळे शाळेचे प्रांगण अतिशय सुंदर दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी आता विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेला येणारा अडथळा दूर झालेला आहे. समाज सहभागातूनच यापूर्वी सोलार सिस्टिमही बसवण्यात आलेली आहे. सध्या काही वर्गांच्या दुरुस्तीसाठी आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ही रक्कम मुख्याध्यापक श्री हाडबे टी. एन. यांच्याकडे जमा केली आहे.  

क्लिक करा व पहा:🔴 *प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका स्पृहा जोशी म्हणतेय "आता तर मला परळीला यायलाच..."

शाळेची विद्यार्थी संख्या सध्या 188 असून आठ शिक्षक कार्यरत आहेत. साऊंड सिस्टिम च्या मदतीने घेतला जाणारा उत्तम परिपाठ, आधुनिक असलेले टॅब, संगणक तसेच शासनाने पुरवलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने केले जाणारे दर्जेदार अध्यापन, स्पर्धा परीक्षांची तयारी, दर आठवड्याला वेगळे उपक्रम, वेगळ्या स्पर्धा आणि त्यांची बक्षिसे, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तालुक्यात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष या सगळ्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मिरवट नावारूपास आली आहे. 

Click&watch:➡️ *अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं परळी सोबतचं नातं.*

ग्रामपंचायत सुद्धा आघाडीवर...

     मिरवट या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीनेही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवला असून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

शाळेची सुंदर इमारत आणि स्वच्छता याचे गुणही या स्पर्धेमध्ये गृहीत धरण्यात आले होते. शाळेमध्ये प्रवेश करत असताना आम्ही राजकारण बाहेर सोडतो त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही निवडणुकीपुरतेच राजकारण असते एरवी आम्ही मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांशी राहतो असे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले. 

क्लिक करा व पहा:*वैद्यनाथ विद्यालयाचा पंकज नाईकवाडे एन.एम. एम.एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र*

गावकऱ्यांनी शाळेप्रती दाखवलेला विश्वास भविष्यात आम्ही सार्थ करून दाखवू असे मुख्याध्यापक श्री हाडबे टी. एन. आणि शिक्षक वृंदांनी बोलून दाखवले आणि गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !