MB NEWS: गोपाळ आंधळे यांचा विशेष लेख:विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ!

 विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ!

-----------‐----------------------

✍️विशेष लेख:गोपाळ आंधळे,परळी वै. 

-----------‐---------------

           सर्व विद्यांचा अधिपती म्हणजे श्री गणेश भगवान ते समूळ सृष्टी चे विघ्नहर्ता आहेत. बुध्दिची देवता म्हणून सर्व देवतांनी आणि ऋषीमूनींनी गणरायांना प्रथम स्थान दिले आहे. कुठलेही कार्यसिध्दी करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना करावी लागते. असे धर्मशास्ञ सांगते. अशा या विघ्नहर्त्या गणेशांची जन्म भूमी ही दुसरी तिसरी कोठे नसून वैवस्वत मन्वंतरात ज्या तिर्थक्षेत्रात प्रभाकर क्षेञ म्हणून उल्लेख येतो ते तिर्थक्षेत्र म्हणजेच  आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र हेच होय. 

     भगवान श्री गणेशाची जन्म कथा पुराणात अशी आलेली आहे की,एकदा ब्रम्हदेव अत्यंत क्रोधित असतांना त्यांचा संबंध महाजृभेशी झाला. त्यातून एक अपत्य जन्मास आले. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याचा वर्ण शेंदराप्रमाणे लाल असल्यामुळे त्यास सिंदूर म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रम्हदेवाने या आपल्या मुलाला प्रसन्न होऊन वर दिला की,तू ज्या कोणाला मिठीत घेशील तो मृत्यू पावेल. विनासायास मिळालेल्या अचाट शक्ती मुळे सिंदूराने उच्छांद मांडला त्याच्या या उच्छादामुळे सर्व देवदेता आणि ऋषीगण हैराण झाले. शेवटी सर्व जन ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन गेले. परंतु ब्रम्हदेवाने त्यांना नम्र पणे सांगीतले की, मी केवळ सृष्टी निर्माण करता आहे. कोणाला मारण्याचे कार्य माझे नाही. आपण भगवान शंकराकडे जावे. त्यानूसार सर्व देवदेता आणि ऋषी गण भगवान शंकरजींकडे गेले आणि त्या सिंदूर म्हणजेच विघ्नासूराची हकीगत सांगीतली. भगवान शंकरानी त्यांना सांगितले की, विघ्नासूराच्या पापाचा घडा भरला आहे. लवकरच माता पार्वती च्या उदरातून श्री गणेशांचा जन्म होईल तोच विघ्नासूराचा वध करेल. ही बाब विघ्नासूरास कळली.जसा कंस कृष्णाच्या जन्म वेळी माता देवकीच्या गर्भासाठी पाळत ठेवून होता. त्याच प्रमाणे विघ्नासूर ही होता. 

.        माता पार्वती चे बाळंतपण सुरक्षित ठिकाणी व्हावे म्हणून भगवान शंकरांनी जया आणि विजया यांना सोबतीला देऊन माता पार्वतीस प्रभाकर क्षेञी पाठवले. विघ्नासूर ही त्याच वेळी आपल्या पित्याने स्थापन केलेल्या श्री सिध्देश्वर लिंग आणि ब्रम्हेश्वर लिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रभाकर क्षेञी आला. त्याने येताना ब्राम्हण वेश धारण केला होता. येथे आल्यावर त्याला एक सुंदर स्त्री पद्मसरोवराचे ठिकाणी निद्रित अवस्थेत दिसली त्याने विजया या दासीला विश्वासात घेऊन ती स्ञी माता पार्वती असल्याची खात्री करून घेतली. आणि अतिशय लहान रूप धारण करून पार्वती च्या गर्भात प्रवेश करून त्या गर्भाची मान मुरगाळून टाकली आणि तो निघून गेला. आपल्या पत्नीची खुशाली पहाण्यासाठी भगवान शंकर कैलासाहून प्रभाकर क्षेञी येत असताना रस्त्यातच भगवान शंकरांचे आणि गजासूराचे युध्द झाले.

             शंकरांनी गजासूराचे मुंडके कापून ते शिर आपल्या सोबत घेऊन प्रभाकर क्षेञी आले. नूकतीच माता पार्वती पण प्रसूत झाली. परंतु जन्मलेल्या बाळास शिर नव्हते. भगवान शंकरांनी सोबत आणलेले. गजासूराचे शिर त्या बाळास बसवले आणि प्रभाकर क्षेञी असलेल्या अमृत कूपी तीर्थातील तिर्थ शिंपडून त्या बाळास संजीवनी दिली. तोच परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री दक्षिण मुखी असलेला. बिनसोडेचा श्री गणेश होय. या श्री गणेशाचे प्रथम दर्शन घेऊनच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घ्यावे तरच दर्शन पूर्ण होते. 

        अशा या विघ्नहर्त्या गणेशांची जन्म भूमी ही दुसरी तिसरी कोठे नसून वैवस्वत मन्वंतरात ज्या तिर्थक्षेत्रात प्रभाकर क्षेञ म्हणून उल्लेख येतो ते तिर्थक्षेत्र म्हणजे च परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र होय. 

लेखन :

गोपाळ रावसाहेब आंधळे 

9823335439


टिप्पण्या

  1. 🚩🙏जय श्री गणेश महात्म्य प्राप्त 🙏🚩

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 🙏🚩श्री गणेश महात्म्य प्राप्त झाले. 🚩🙏 "आसाराम पाटील"
      !!घोडा कौडगावकर !!
      ता. परळी वैजनाथ (प्रभाकर क्षेत्र) .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !